*संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*
चंद्रपुर /- उत्तर भारतीयांचा पवित्र सण छठ महापर्व लक्षात घेऊन चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक छठ पूजा स्थळांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी यांनी केली आहे. रुद्रनारायण तिवारी यांच्या मते औद्योगिक जिल्हा असल्याने शेकडो वर्षांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी उत्तर भारतीय नागरिक स्थायिक आहेत. येथे मोठ्या संख्येने उत्तर भारतीय समुदाय WCL वेकोली खाणींच्या वसाहती आणि सिमेंट कारखान्याच्या वसाहतीच्या परिसरात तात्पुरते राहतात. सर्वजण छठ सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात. महापर्व चंद्रपूर शहरातील उर्जानगर कॉलनी, शक्तीनगर कॉलनी, घुग्घुस शहर, बल्लारपूर, राजुरा, सास्ती, अंबुजा, माणिकगड, आवारपूर अल्ट्राटेक, गडचांदूर, भद्रावती, माजरी, वरोरा, दुर्गापूर, चांदा ऑर्डिनन्स फॅक्टरी, माजरी आदींसह आसपासच्या भागात जिल्ह्यात छठ पूजेचे ठिकाण आहे.
ज्या भागात कचर्याने भरलेले असतात आणि वर्षभर लक्ष न दिल्याने खराब होतात, अशा ठिकाणी साफसफाई करण्याची तसेच खराब झालेल्या ठिकाणांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम वेकोलि खाण व्यवस्थापक, एमईएल स्टील प्लांट, सर्व सिमेंट कारखाना व्यवस्थापन, महानगरपालिका प्रशासन, नगरपालिका प्रशासन व्यवस्थापन आदी प्रत्येक भागातील सामाजिक बांधिलकीतून करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी यांनी केली आहे.