पवईतील हॉटेल टुरिस्ट बेकायदा १४ वाढीव खोल्या व स्टुडिओ बांधकामाविरोधात डॉ. माकणीकरांचा अमरण उपोषणाचा इशारा

0
13

मुंबई :  शहरातील पवई येथील हॉटेल टुरिस्टमध्ये वाढीव बेकायदा बांधकाम करून १४ खोल्या व स्टुडिओ ची उभारणी करण्यात आलेली आहे , या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकाकडून मुंबईला पाणी पूरवणाऱ्या पवई तलावला प्रश्नचिन्ह उपस्थित करून एखादी दुर्दैवी घटना घडल्यास या प्रकरणाला पोलीस आणि पालिका प्रशासन जबाबदार राहील का? असा खडा सवाल रिपब्लिकन पक्ष संविधानचे सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे,*

 

सदर हॉटेल कायमस्वरुपी बंद करण्यात यावे,

या बेकायदा बांधकामावर कारवाई झाली नाही व हॉटेल मालक अशोक रायला अटक नाही झाली तर अमरण उपोषण करण्याचा इशारा माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे

 

पवईतील हॉटेल टुरिस्ट हे परदेशी देशी पर्यटकांसाठी खुले आहे त्या ठिकाणी अल्पवयीन जोडप्यांना काही तासांसाठी ठराविक भाडे आकारून वासना शमविण्यास खोली दिली जाते या हॉटेलचे मालक के अशोक राय यांनी तर कहरच केला आहे पोलीस आणि पालिका अधिकारी माझ्या खिशात आहेत असे सांगून त्याने प्रशासकीय यंत्रणेची खिल्ली उडवली आहे असाही माकणीकर यांनी गंभीर आरोप केला आहे.

 

हॉटेल टुरिस्टच्या मालकाने मागील खुल्या जागेवर बेकायदा बांधकाम करून स्टुडिओ उभारला आहे, माकणीकर यांनी सांगितले हा स्टुडिओ भाड्याने देऊन त्यातून लाखो रुपयांची माया जमवली जात आहे बाजूलाच तलाव आहे त्या पिण्याच्या पाण्यात कुणी काही टाकलं आणि एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदारी घेणार याचाही प्रशासनाने खुलासा करावा असेही माकणीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

महापालिकेकडे हॉटेल टुरिस्टचे ऑडिट बाकी असताना यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच कर्तव्यात कसूर केल्याचाही पालिका अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केला आहे या विरोधात कठोर कारवाई न झाल्यास 5 नोव्हेंबर रोजी राजभवन येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन संविधान पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ माकणीकर यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here